Sunday, December 10, 2006

पुण्यात देशातील दुसरे फूलपाखरांचे उद्यान तयार

पुणे, ता. १० - देशातील फूलपाखरांचे दुसरे उद्यान पुण्यामध्ये अरण्येश्वरमध्ये तयार करण्यात आले असून, ते उद्‌घाटनाच्या प्रतीक्षेमध्ये आहे. ........
हे उद्यान पूर्णपणे विकसित झाल्यानंतर त्यामध्ये विविध जातींची दहा हजाराहून अधिक फुलपाखरे पहावयास मिळणार आहेत.

नगरसेवक आबा बागूल यांच्या प्रयत्नांतून हे उद्यान विकसित होत असून, आंबिल ओढ्याच्या कडेला असलेल्या एक एकर सामाईक जागेमध्ये ते तयार करण्यात आले आहे. सहकारनगर परिसरातील वसंतराव बागूल उद्यान ते अरण्येश्वरदरम्यान आंबिल ओढ्याच्या कडेने सुमारे अडीच एकर लांबीचा "जॉगिंग ट्रॅक'ही तयार करण्यात आला असून त्याच्या बाजूला हे उद्यान विकसित करण्यात आले आहे.

बंगळूरमध्ये देशातील फूलपाखरांचे पहिले उद्यान तयार करण्यात आले आहे. पुण्यामध्ये सुमारे दीड वर्षांपूर्वी या उद्यानाच्या उभारणीस प्रारंभ करण्यात आला. बंगळूरमध्ये त्यानंतर उद्यानाचे काम सुरू करण्यात येऊन त्याचे उद्‌घाटनही करण्यात आले. फूलपाखरांचे आयुष्य वीस दिवसांचे असते हे लक्षात घेऊन या उद्यानामध्ये एका वेळेस किमान दहा हजार फूलपाखरे राहतील असे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती श्री. बागूल यांनी दिली. हे उद्यान तयार असून महापौरांच्या सोईने येत्या आठवड्यामध्ये त्याचे उद्‌घाटन करण्यात येणार आहे. हे उद्यान हे पुण्यात येणाऱ्या पर्यटकांच्या आकर्षणाचे विषय ठरावा असे नियोजन करण्यात आले आहे.

eSakal

0 Comments:

Post a Comment

<< Home